शब्दांचे सामर्थ्य



शब्दांचे सामर्थ्य

                एकदा बेडकांचा कळप जंगलातून चालला होता, त्यातले दोन बेडूक खोल खड्ड्यात पडले. वर येण्याचा खुप प्रयत्न केला पण त्या दोघांना वर येता येईना. वर असलेल्या बेडकांनी सुरुवातीला त्यांना वर येण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. शेवटी वर असलेल्या बेडकांनी दोघांनाही सल्ला दिला. आता उड्या मारुन काही उपयोग नाही. खड्ड्यात मरणे तुमच्या नशिबाबत होते; त्याचा स्वीकार करा. एका बेडकाला आपल्या मित्रांचे म्हणणे पटले. त्याने उड्या मारण्याचे सोडून दिले आणि मरुन गेला. दुसरा बेडूक मात्र बाहेर पडायचा प्रयत्न करतच होता. वरचे बेडूक त्याला ओरडून सांगत होते. बाहेर पडायचा प्रयत्न करु नकोस तिथेच मरुन जा. पण वरचे बेडूक ओरडले की हा बेडूक आणखी जोमाने प्रयत्न करत असे. असे करता करता तो बेडूक बाहेर आला. इतर बेडकांनी विचारले, तुला आम्ही काय सांगत होतो ते कळत नव्हते का? बेडूक म्हणाला, मला ऐकू येत नव्हते. मला वाटले मी बाहेर येण्यासाठी तुम्ही मला प्रोत्साहन देत आहात.
तात्पर्य:-प्रयत्नांची पराकाष्ठा यश देते.